Best Suvichar sangrah in Marathi | 100+ नवीन सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह


Sunday 3 January 2021

ADVERTISEMENT

 Best Marathi Quotes-Marathi suvichar sangrah in Marathi/मराठी सुविचार संग्रह

           "सर्वोत्कृष्ट मराठी प्रेरणादायक सुविचार नेहमी आपल्या जीवनात उत्साह भरतात, जे आपल्या जीवनात आवश्यक असतात. सुविचार नेहमीच आपल्याला Inspire ठेवतो. आपण आपल्या दिवसाची सुरुवात चांगली कल्पनांनी केली पाहिजे. जेणेकरून आम्ही Positive and Motivate राहू आणि त्याच वेळी आम्ही आपल्या मित्रांना Positive Energy देऊ शकू. यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटद्वारे आपल्याला Suvichar in Marathi with Images देखील देत आहोत, जे आपण आपल्या मित्रांसह आणि आपल्या कुटूंबासह सामायिक केले पाहिजे."


प्रेरणादायक सुविचार मराठी
,

Motivational and inspirational Marathi suvichar आयुष्यात यश मिळविण्यात नक्कीच मदत होईल. आम्ही प्रामुख्याने life, success, stress, students, school, parents, relationship, and much other topic साठी सुवीचर पाठविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

I’ve compiled a list of some of the best motivational quotes/Good thoughts in Marathi so you can start the year by taking control of your thoughts, thinking positively and setting new goals. Also, we’ve include marathi love Quotes, Life marathi Quotes,Good morning Quotes in marathi font, Inspirational Quotes for student, marathi Motivational Quotes, jivnavar suvichar, Motivational suvichar. So, enjoy this collection of  प्रेरणादायक सुविचारसंग्रह मराठीमध्ये/Best Motivational Quotes collection in Marathi👌....

Motivational suvichar in marathi for success



100+ Best Suvichar in Marathi with images – चांगले आणि नवीन मराठी सुविचार 



“तुम्ही तुमच्या सवयी बदलत नसता तुम्ही त्याच रस्त्याने चालत असता तुम्ही वेगळे रंग परिधान करत नसता तुम्ही अनोळखी माणसासोबत बोलत नसता ज्या वेळी तुम्ही रिस्क घेत नसता त्यावेळी तुम्ही हळू-हळू मरत असता”

“पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.”

“प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.”

“प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्की गाठतात.”

“नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.”

“जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते”

“सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.”

“स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.”

“कमी ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे.”

“चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.”

“जसे शरीराला रोज साबणाने घासून स्वच्छ आणि ताजेतवाने करावे लागते तसेच, मनाला सुद्धा स्वच्छ आणि उत्साही राहण्यासाठी रोज प्रेरणादायी”

“काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो की उपदेश, सुविचार आणि सल्ला फक्त इतरांना देण्याकरता आणि इतरांनी आचरणात आणण्याकरताच असतात”

“जे लोक तुमचा द्वेष करतात त्यांना तुमच्यावर प्रेम करायला लावण्यात वेळ घालवण्याऐवजी जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते तुमच्यावर आणखी प्रेम कसे करतील याकडे लक्ष देणे अधिक चांगले!”

“सामर्थ्य म्हणजे जीवन दुर्बलता म्हणजे मृत्यू विस्तार जीवन आहे आकुंचन मृत्यू आहे प्रेम म्हणजे जीवन शत्रुत्व म्हणजे मृत्यू”

”ज्याने आयुष्यात काहीच साध्य केले नाही, त्याने तुम्ही काय करायला हवे हे तुम्हाला बिलकुल सांगू देऊ नका”

“तुमच्या आयुष्याचे नियंत्रण तुमच्या स्वत:च्याच हाती ठेवा, नाहीतर ते नियंत्रण दुसरे कुणीतरी घेईल”

“बदल कुणीही घडवून आणू शकतो जे कराल ते मनापासून करा मनापासून प्रयत्न केल्यास बदल घडतोच”

“कुलूपे फक्त प्रामाणिक माणसांनाच दूर ठेवतात”

”कोणतेही काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते; पण वृत्ती मात्र हलक्या दर्जाची असू शकते”

”ज्या माणसाला स्वतःचे असे अंतस्थ आयुष्य नसते; तो आजूबाजूच्या परिस्थितीचा गुलाम असतो”
Motivational suvichar marathi


”माझ्या मालकीच्या किती गोष्टी आहेत यावरून माझी समृध्दी आणि श्रीमंती ठरत नाही; तर माझ्या गरजा किती कमी आहेत यावरून ते ठरते”

”काही वेळेला आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापेक्षा; स्वतःलाच बदलण्याची गरज असते”

”आपल्या परिस्थितीमुळे नाही; तर आपल्या मनोवृत्तीमुळे आपल्याला आनंद मिळत असतो”

”असे वागा की तुम्ही जे काही करणार त्याने काही ना काही फरक नक्की पडणार आहे; आणि तो पडतोच!”

“ज्याचेकडे जगण्याचे सबळ कारण आहे असा माणूस; कसेही करून आयुष्यातील कशाही आणि कोणत्याही गोष्टीतून हमखास तरून जातो आणि सहन करतो”

“दररोज संध्याकाळी मी माझ्या काळज्या देवावर सोपवून देते; तसाही तो रात्रभर जागाच असतो”

“स्वप्ने पाहिली पाहिजेत, ती पूर्ण होतात! नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली?”

”काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात”

”तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपीत कधीही कुणालाही सांगू नका, अगदी मित्रालाही नाही! तो कधीतरी ते गुपीत इतरांजवळ उघडे करणारच! गुपीत त्यालाच म्हणतात जे आपण कुणालाच सांगत नाही आपण स्वत:च आपले गुपीत इतरांना सांगण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही तर इतर कुणी आपले गुपीत लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही काय? “

”नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे, तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत तुमचा रस्ता तुम्हालाच स्वत:लाच चालायचा आहे”

“दुसर्‍याच्या पराभवाची वाट बघणार्‍याला हे समजतच नाही की तो दुसर्‍याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वत:चा वेग आपोआपच कमी होत असतो”

“माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण मात्र त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं.”

“सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत”

”आपल्या मागच्या पिढीतील लोकांना ज्या गोष्टीबद्दल आपण नावे ठेवली, त्यांच्या ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या नाहीत त्याच नेमक्या जर आपण पुन्हा आपल्या पुढच्या पिढीसोबत करू लागलो तर आपल्यासारखे दांभिक, दुटप्पी, स्वार्थी आणि खोटारडे आपणच!”

“तुम्ही कुणाकडूनच काहीच अपेक्षा ठेवली नाही तर तुम्ही कधीही निराश होणार नाहीत”

”जीवनात व्यापक अनुभव येण्यासाठी गोष्टी करा - वाचन, पर्यटन आणि श्रवण”

”खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला”

”मुर्खाचे हृदय जिभेवर असते, शहाण्याची जीभ हृदयात असते”

चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही

Educational Quotes in marathi/शैक्षणिक सुविचार मराठी



“आयुष्याचे ५ नियम
१ स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका
२ जास्त विचार करणं बंद करा.
३ भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.
४ दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार
करू नका
५ सतत आनंदी रहा.”

”इतरांबद्दल तोंडावर स्पष्ट बोलणारा व्यक्ती, इतरांनी त्याचेबद्दल स्पष्ट बोलल्यावर का दुखावतो?”

” पाप नक्कीच वाईट आहे पण त्याहूनही वाईट पुंण्याचा अहंकार आहे”

”हुशार व्यक्तीचा खरा दागिना म्हणजे ज्ञान होय”

”सगळ्यांत योग्य धोरण कोणतं? प्रामाणिकपणा! फक्त त्याला व्यवहार ज्ञानाची जोड द्या”

“कोणाचा निषेध करू नका जर आपण मदतीसाठी हात वर करू शकत असाल तर नक्कीच वाढवा जर आपण वाढवू शकत नाही तर हात जोडून आपल्या भावांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.”

”तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो”

”विचार बदला आणि तुमचे आयुष्य बदलेल!”

”ज्याच्या डोळ्यावर अहंकाराचा पडदा पडलेला आहे त्याला ना स्वतःचे अवगुण दिसत असतात, ना दुसऱ्याचे गुण दिसत असतात”

”गुन्हेगार हा जमिनीत वाढणाऱ्या अनावश्यक गवतासारखा असतो एक उपटून फेकले की त्याच्या जागी दुसरा कधी न कधी उगवतोच”

”तुम्ही एखाद्या व्यक्तीला सर्वकाही देत असाल, तरी देखील ते त्याला अपूर्ण पडत असेल तर समजावे की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला देत आहात”

”एखाद्या गोष्टीवर किंवा मुद्द्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही याचा अर्थ, मला हे सगळं समजलंच नाही आणि मान्य नाही किंवा सगळंच समजलं आणि मान्य आहे असा होत नाही”

”एखाद्या गोष्टीवर मी काही बोललोच नाही याचा अर्थ मला काही बोलायचेच नव्हते असेही नाही”

”ज्या दिवशी तुम्ही तुमचे आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच तुमचा दिवस आहे बाकी तर काय फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत”

”एखादेवेळेस खोटे बोलणे सत्य बोलण्यापेक्षा योग्य असते फक्त ते कुणाला हानिकारक नसावे आणि ते कुणाचा घात आणि अवमान करण्यासाठी वापरलेले नसावे कारण सत्य सुद्धा सापेक्ष असते एकाला एक गोष्ट सत्य तर दुसऱ्याला अर्धसत्य किंवा असत्य वाटू शकते कारण सत्याच्या अनेक बाजू असतात मला तर वाटतं की सत्य असत्याचा घोळ नसावा म्हणून मौन रहाण्याचा शोध लागला असावा”

”जेव्हा आपली वेळ वाईट असते, तेव्हा लोकही वाईट वागतात आणि चांगली वेळ आली की, सगळेच चांगले वागतात दोष लोकांचा नाही तर वेळेचा आणि परिस्थितीचा आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला, म्हणजे बाकी सगळं आपोआप बदलेल”

”कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा कारण नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे”
Life Quotes in Marathi


”कितीही केलं तरी तेथे कमीच असते, जेथे नावडतीचं मीठ अळणीच असते म्हणजेच एखाद्याने आपले दोषच काढायचे ठरवले तर आपण कितीही चांगले वागले तर त्याला आपले गुण दिसणारच नाहीत तो आपल्यावर टीका आणि निंदाच करेल अश्या टिकेकडे एका मर्यादेपर्यंत दुर्लक्ष करावे डोक्याच्या पार गेले की मग मात्र धडा शिकवावा”

”विचारी माणसाने दिवसा अशी कर्म करावी की त्याला रात्री सुखाने झोप येईल तरुणपणात अशी कर्म करावी की त्याला म्हातारपणात सुख मिळेल आणि जन्मभर अशी कर्म करावी की त्याला परलोकात आणि पुढील जन्मात देखील सुख मिळेल”

”भुते आणि राक्षस दुसरीकडे कुठे नाही, तर आपल्याच आत मध्ये राहात असतात कधीकधी ते आपल्यातल्या माणुसकी वर विजय सुद्धा मिळवतात!”


”जगा इतके की, आयुष्य कमी पडेल हसा इतके की, आनंद कमी पडेल काही मिळाले किंवा नाही मिळाले, तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल”

”आपण विश्वातील प्रत्येकच गोष्टीत कार्यकारण भाव शोधू नये काही गोष्टी श्रद्धेने आणि विश्वासाने स्विकाराव्यात आयुष्यात श्रद्धा जरूर असावी”

“श्रद्धेची कधी चिकित्सा करू नये तसेच इतर कुणाच्या श्रद्धेची टर उडवू नये श्रद्धा आणि विश्वास मोठमोठे बदल आणि चमत्कार घडवतात”

”या जगात चांगली माणसे भरपूर असतात आणि चांगले प्रसंग, घटना घडतात आणि यापुढेही घडत राहणार! फक्त तसे होईल असा विश्वास पाहिजे मग ही चांगली माणसे आपोआप तुम्हाला आपल्या आसपास दिसायला लागतील आणि चांगल्या घटना घडतांना दिसू लागतील”

”समोरच्या व्यक्तीला त्याच्या जीवनातल्या त्याच्या एखाद्या भूमिकेबद्दल दूषणे देत असतांना आणि अपेक्षा करत असतांना, आपण त्या भूमिकेत होतो तेव्हा आपण काय केले होते (आणि नव्हते), याची जाणीव आणि आठवण नेहेमी असू द्यावी”

”प्रेयसीचा एकनिष्ठपणा तेव्हाच पणाला लागतो जेव्हा तिच्या प्रियकराकडे काहीच नसतं किंवा असलेलं नष्ट होतं प्रियकराचा एकनिष्ठपणा तेव्हाच पणाला लागतो जेव्हा त्यांचेकडे सगळं काही असतं किंवा मिळतं”

”आपण कुणाला कितीही कसेही समजावून सांगितले तरी ज्याने समजून घ्यायचे नाही असे ठरवले आहे, तो आपल्याला कधीही समजून घेणारच नाही कारण झोपेचे सोंग घेणाऱ्याला झोपेतून उठवता येत नाही ज्याने आपल्याबद्दल गैरसमज करायचे मनाशी ठरवले आहे त्याला कितीही समजावले तरी फायदा नाही”

”आपण जर फक्त संपर्कातल्या प्रत्येकालाच खुश ठेवण्यासाठी कर्म करत आणि जगत राहिलो तर आपण झिजून झिजून संपून जाऊ पण इतर लोकांच्या अपेक्षा कधी संपणार नाहीत आणि तरीही कुणी ना कुणी तुमच्यावर नाखूष असेलच! हे लक्षात ठेवा की लोक घोड्यावर ही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत त्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहून आणि आपल्या अंतरात्म्याचे ऐकून त्यानुसार कर्म करा”

”प्रेम, संवाद, कर्तव्य, हक्क आणि अपेक्षा या गोष्टी कधीच एकतर्फी असू नयेत असल्यास त्या अयशस्वी आणि निरर्थक होतात”
One line Marathi suvichar


”कुणाजवळही मदत, सल्ला किंवा माहिती मागतांना लाज, भीती आणि संकोच वाटून घेऊ नये कारण आपण परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण नसतो व असहाय्य असू शकतो पण मागितल्यावर एखाद्याकडून तिन्ही गोष्टी मिळाल्या नाहीत तर लगेच त्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून त्याची निंदा व बदनामी करू नये कारण ती समोरची व्यक्ती सुद्धा परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण नसते व असहाय्य असू शकते”

”मागीतल्याशिवाय कुणालाही सल्ला, मदत, किंवा माहिती देऊ नये नाहीतर कुणालाच त्यांची किंमत, महत्व आणि आदर राहात नाही”

”फक्त आपणच दिलेली माहिती, मदत आणि सल्ला समोरच्याने मानला पाहिजे असा आग्रह धरू नये मागितल्यावर शक्य झाल्यास देणे आपले काम घेणे न घेणे हा निर्णय समोरच्या व्यक्तीवर सोडावा”

”ही दुनिया दांभिक आहे या जगात नेहमी सावधतेने पावले टाका येथे पावलापावलावर धोके आहेत ही व्यक्ती धोकेदायक आहे असे धोक्याचे इशारे कोणत्याच व्यक्तीच्या कपाळावर चिटकवलेले नाहीत ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत नाही ओळखता आले तर आपली घोर फसगत होते त्यातून बाहेर निघता निघता आपल्या जीवनातला अमूल्य वेळही निघून जातो आणि धोका देणारा मात्र नामनिराळा होतो, त्याचा हेतू साध्य होतो आणि आपण मात्र बरबाद होतो”

”एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात”

”आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व बहाल करतांना त्यांचे माणूसपण विसरू नका त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे तसेच पत्नी, सून ही गृहलक्ष्मी असते पण तीला देवत्व देताना तीला माणूस म्हणून समजुन घेणे आणि स्वीकारणे जास्त महत्वाचे आहे, नाही का?”

”स्त्रीच्या अस्तित्वामुळेच पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ प्राप्त होतो आणि पुरुषाच्या अस्तित्वामुळेच स्त्रीच्या स्त्रित्वाला अर्थ प्राप्त होतो दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि निरर्थक आहेत दोन्ही एकमेकांचे स्पर्धक नसून दोन्ही एकमेकांना पूरक आहेत”

”समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर म्यान बना तलवार बनलात तर वार होईल ढाल बनलात तरी वार होईल म्यान बनलात तर तो मनुष्य तुमच्यात सामावून जाईल”

”कठीण काळ कायम टिकाऊ नसतो, पण कठीण लोक असतात”

”अपयश कायम नसते यश सुद्धा!”

“सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळत परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.”

”पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल”

”एखाद्या कृतीमध्ये पाप नसते त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत नाही का?”

”कसलीच लाज नसणे हीच एक लाजीरवाणी गोष्ट!”

”शब्द विविध पद्धतीने योजले असता वेगेवेगळा अर्थ निघतो आणि अर्थ वेगेवेगळ्या पद्धतीने योजल्यास वेगळा परिणाम साधता येतो”

”चांगल्या गोष्टीचा अतिरेक एका लहान वाईट गोष्टी पेक्षा जास्त नुकसान करतो”

”कुणी कुणाची नक्कल करून जीवनात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचे जीवन आणि मार्ग वेगळे असतात”

”प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंदात पड़ू नका ऐकणारे लोक त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात”

“तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याची प्रिय वस्तू, गोष्ट, व्यक्ती हिरावून घेतली तर नंतर नियती त्या बदल्यात तुमची प्रिय वस्तू, गोष्ट, व्यक्ती आणि तुमच्या प्रिय व्यक्तीची प्रिय वस्तू, गोष्ट, व्यक्ती हिरावून घेते हा निसर्गाचा नियम आहे आणि तो कधीही खोटा ठरत नाही”
प्रेरणादायक सुविचार मराठी



”ह्या जगात शोधल्यावर सगळ्या गोष्टी सापडतात फक्त आपली चूक सापडत नाही”

”स्वर्गाची आशा सोडा आणि नरकाची भीती सुद्धा सोडून द्या पाप पुण्याची चिंता सोडा फक्त तुमच्यामुळे कुणाचे हृदय दुखावणार नाही एवढी काळजी घ्या आणि बाकीचे निसर्गावर सोडा”

“तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे.”

“माणुसकीच्या भावनेची सर्वोत्तम अभिव्यक्ती म्हणजे प्रेम आणि दानवतेच्या भावनेची सर्वोत्तम अभिव्यक्ती म्हणजे द्वेष”

”प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत, कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिध्द होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात”

”एकवेळ एकरंगी शत्रू/विरोधक/परके-माणसं चालतील पण सतत रंग बदलणारे मित्र/समर्थक/आपले-माणसं धोकादायक!

”स्त्रीच्या अस्तित्वामुळेच पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ प्राप्त होतो आणि पुरुषाच्या अस्तित्वामुळेच स्त्रीच्या स्त्रित्वाला अर्थ प्राप्त होतो दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि निरर्थक आहेत दोन्ही एकमेकांचे स्पर्धक नाहीत तर दोन्ही एकमेकांना आहे पूरक आहेत”

”समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर म्यान बना तलवार बनलात तर वार होईल ढाल बनलात तरी वार होईल म्यान बनलात तर तो मनुष्य तुमच्यात सामावून जाईल”

”संशय म्हणजे स्वत:च्या अंगाभोवती लपेटलेला साप होय तो कधी ना कधी आपल्याला दंश करतो त्याचबरोबर त्याच्या भीतीने इतर लोक आपल्यापासून दूर जातात”

”बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे”

”कधीही कुणाची कुणाशी तुलना करु नये स्वत:ची सुद्धा कुणाशी तुलना करू नये कारण कोणतेही दोन व्यक्ती एकसारखे नसतात”

”चांगल्या गोष्टीचा अतिरेक एका लहान वाईट गोष्टी पेक्षा जास्त नुकसान करतो”

”कुणी कुणाची नक्कल करून जीवनात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचे जीवन आणि मार्ग वेगळे असतात”

”आपल्याजवळ जी गोष्ट नाही पण इतरांजवळ आहे, तेव्हा इतरांकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि ज्यांचेजवळ ती आहे त्या गोष्टीचा/व्यक्तीचा हेवा आणि द्वेष करू नका आणि ती गोष्ट तुच्छ मानू नका नंतर तीच गोष्ट तुम्हाला मिळाली तरी त्या गोष्टीला तुम्ही तुच्छ मानणार काय?”

”आपल्याजवळ जी गोष्ट आहे पण इतरांजवळ नाही, तेव्हा आपल्याकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि इतरांना मिळावी यासाठी प्रार्थना करा पण ती गोष्ट आपल्याजवळ असल्याचा अभिमान व गर्व बाळगून इतरांना कमी लेखू नका ती गोष्ट तुमच्यापासून हिरावून घेतली गेली तर काय कराल?”

”तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेतली तर नंतर नियती त्या बदल्यात तुमची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती आणि तुमच्या प्रिय व्यक्ती ची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेते”


“दोन व्यक्तींमध्ये तुलना करणाऱ्या व्यक्तींचा हेतू कधीच उदात्त नसतो कारण तुलना करून त्या दोन व्यक्तींपैकी कुणीच सुधारत नाही पण त्या दोघांमध्ये द्वेष भावनाच वाढीस लागते लोक तुलनेतून नाही तर प्रेरणेतून सुधारतात तुलनाबाज लोकांचा हेतू एकच असतो - दोन्ही व्यक्तींची तुलना करून त्या दोघांवर अंकुश ठेवणे”

”आपण सर्वजण म्हणजे निसर्ग, प्राणी, पक्षी आणि मानव हे सगळे त्या सर्वशक्तिमान परमात्म्याचे अंश आहोत! लक्षात ठेवा की मृत्यूनंतर आपलं शरीर नष्ट होतं, पण आत्मा नाही आत्मा अमर असतो!”

Mahan vykti suvichar in marathi/महान व्यक्ती सुविचार मराठी



”आत्म्याकडून परमात्म्याकडे, प्रदर्शनाकडून दर्शनाकडे, सकाम कर्माकडून निष्काम कर्माकडे, स्वार्थाकडून परमार्थाकडे आणि वासनेकडून उपासनेकडे जाणे हेच आयुष्याचे ध्येय असायला हवे!”

“जीवनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे, जीवनातील सगळ्या समस्यांचे समाधान, जीवनातील सगळ्या शंकांना पूर्णविराम आणि जीवनातील सगळ्या भयांची समाप्ती जेथे होते ते ठिकाण म्हणजे भगवदगीता होय”

”अंतिम समयी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, एखाद्याचे या जगातील ठरलेले विहीत कार्य संपुष्टात आले की त्याने एखादा जास्तीचा क्षणसुद्धा पृथ्वीवर घालवला तर निसर्गाचे संतुलन बिघडते या जगात प्रत्येक जण एका विशिष्ट कार्यासाठी आलेला असतो ते पूर्ण झाले की त्याची जायची वेळ येत असते माझेही धर्मस्थापनेचे कार्य आता झालेले असल्याने मी एक क्षण सुद्धा आता पृथ्वीवर राहाणे योग्य नाही मला जायलाच हवे आधार: सोनी टिव्ही सिरियल - सुर्यपूत्र कर्ण: दिनांक - ऑगस्ट) [राम अवतारात रामाने वालीला बाणाने मारले होते त्याच वालीने पुनर्जन्म घेऊन श्रीकृष्णाला अनावधानाने तळपायाला बाण मारला होता त्यात श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता (अवतार संपला)]”


“श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगीतली कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो”

”दोन व्यक्तीत कोणी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तर ती लागत नसते, आग लावणाराच जळून राख होतो !”

”कधीही संतापू नका कारण लोखंड थंड असते तेव्हा कणखर आणि कडक असते पण लाल झाले की त्याला लोक हवा तसा आकार देतात”

”नवर्‍याला ‘अहो’ आणि बायकोला ‘अगं’ म्हणणार्‍या जोडप्यांमध्ये कायम एक असमानता राहते आपल्याकडे बाईला ती पुरुषापेक्षा सर्वार्थाने कमी आहे, कायम त्याच्यावर अवलंबून आहे, असं बजावण्यासाठी म्हणूनच अशा पद्धती रूढ करण्यात आल्या असाव्यात, असं माझं ठाम मत आहे आपल्या रूढी-परंपरांचा मीही प्रचंड आदर करते पण जे निर्थक आणि असमानता निर्माण करणारं आहे ते सोडून देणंच योग्य! नवर्‍याबद्दलचा आदर ही दाखवण्याची नाही तर बाळगण्याची गोष्ट आहे!'”

”चांगल्या लोकांची एक कमजोरी असते कि ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला चांगलेच समजतात”

”समस्येशी सामना करायला सुरुवात करणे ही समस्या सुटण्याची सुरुवात असते!”

”एखाद्याकडून ज्ञान ऐकून ते दुसऱ्याला ऐकवणे याला फार तर आपण उपदेश असे नाव देऊ शकतो पण ते सत्य असेलच असे नाही!”


“ते घर, खरं घर नव्हेच जेथे पुन्हा पुन्हा बेघर व्हायची भीती असते”

”ते प्रेम, खरं प्रेम नसतंच जे तर्काच्या आधारे टिकून आहे”

”जो फक्त आपल्याला जन्म देतो म्हणून त्याचा अधिकार आपल्यावर असण्यापेक्षा जो आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख देतो त्याचा आपल्यावर खरा अधिकार असतो”

”नदीला हे माहित असतं की समुद्रात गेल्यावर तिचे स्वत:चे अस्तित्व नष्ट होणार आहे, तरीही ती पर्वताच्या टोकापासून निघून दूर समुद्रात मिसळण्यासाठी मोठा प्रवास करते कारण तिला समुद्रामुळे एक नवी ओळख मिळणार असते!”

”ज्या देहाचे चोचले पुरविले तो देह आगीच्या भक्ष्यस्थानी पडतो हे अंतिम सत्य माहित असूनही लोक याच देहाच्या सुखासाठी अविरत झटतात, लबाड्या करतात शरीर वासनांच्या तृप्ततेसाठी वाट्टेल ते करतात”

”प्रकाशाचं कौतुक सगळ्यांनाच असतं पण प्रकाशापेक्षा अंधार श्रेष्ठ आहे कारण तो सर्वांना आहे तसा सामावून घेतो”

”पापाच्या पैशातून पुण्याची खरेदी करता येत नाही”

”शंका फक्त शंकेलाच जन्म देते”

ज्या समयी माणसाची सावली सुद्धा सोबत देत नाही ती वेळ असते बाराची म्हणून तर आपण म्हणतो : एखाद्याचे बारा वाजले”

“दु:खात वाटेकरी नसतोच”

”ज्ञात जगापेक्षा अज्ञात जग फार फार मोठं आहे अगदी आजच्या कॉम्प्युटर सारखं त्यामाध्ये अगणित गोष्टी असतात पण पासवर्ड वापरल्याशिवाय त्या दिसत नाहीत तसेच सैतानी लोक षटकर्मातील अनेक मंत्र हे अज्ञात जगातल्या शक्तीशी संपर्क साधण्यासाठी वापरतात, जसे सामान्य माणूस प्रार्थनेद्वारे देवाशी कनेक्ट होतो, तसेच!!”


“विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.”

“दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”

खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.”

“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”

“खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.”

“संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”

“निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.”

“शहाण्याला शब्दांचा मार.”

“तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.”

“करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य”

“रिकामे डोके शैतानाचे घर असते.”

“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो”.

“ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.”

“मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.”
suvichar in marathi


“चकाकते ते सर्व सोन नसते.”

“कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.”

“जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो”

“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”

“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”

“कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.”

“वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.”

“लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.”

“बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.”

“सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.”

“विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.”


Also search:-Marathi Inspiring Quotes/मराठी प्रेरणादायक सुविचार .Educational Quotes in marathi/शैक्षणिक सुविचार मराठी Motivational quotes in marathi for success/यशासाठी मराठी मध्ये प्रेरक कोटस Motivational Quotes in marathi/सुंदर प्रेरणादायी सुविचार मराठी Marathi Motivational Quotes with images/मराठी प्रेरणादायी सुविचार फोटोसह Marathi Motivational Suvichar/ मराठी सुविचारप्रेरणादायक सूविचार-Motivational Quotes  महान लोकांचे सर्वोत्तम प्रेरणादायक विचार-Great people quotes Great Thoughts in marathi /महान विचार मराठी Marathi Quotes collection/मराठी सुविचारसंग्रह मराठी सुविचार जीवनावर-आयुष्यावर-प्रेमावर /Marathi Quotes on life and loveMarathi Quotes About life/मराठी सुविचार आयुष्यावर आधारित Marathi Quotes on life for whatsapp/मराठी सुविचार जीवनावर व्हाट्सअप्पसाठी Marathi Quotes for life/मराठी सुविचार जीवनासाठी Love Quotes in marathi for whatsapp एक ओळ सुविचार-छोटे सुविचार मराठीमध्ये/one line quotes -suvichar in marathi शुभ सकाळ सुविचार-sms-शुभेच्छा/मैत्री सुविचार मराठीमध्ये/ Good Morning Quotes-Friendship quotes-sms-suvichar in marathi Marathi Good Morning sms for whatsapp/मराठी शुभ सकाळ sms  व्हाट्सअप्पसाठीस्वामी विवेकानंद प्रेरणादायक मराठी सुविचार/swami vivekanand quotes in marathi.